कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल

कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल

“कौमार्य” परिक्षा चाचणी ही प्राचीन काळापासूनच्या चालत असलेली कुप्रथा आहे . कौमार्य अबाधित आहे की नाही याची तपासणी लग्नाच्या पहिल्या रात्री करण्याची प्रथा आजही २१ व्या शतकात केली जाते.खरेतर स्त्रीयांवर हा पुरूष प्रधान संस्कृतीचा अमानवीय अत्याचार आहे.अशा कृप्रवृत्तीचा विरोध होणे गरजेचे आहे.याच विचारातून या विषयावर निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी मराठी चित्रपट “कौमार्य” चित्रपटाची निर्मिती केली आहे.कौमार्य हा चित्रपट २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक  सलीम शेख आहेत. मुंबईच्या वेलेनो क्लबमध्ये या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे सुंदर आयोजन झाले, जिथे निर्माता, निर्देशक सह अभिनेते नागेश भोसले, नायक शादाब, नायिका पूजा शाहूसह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ऑडियो लॅबच्या सतीश पुजारींनी घेतली आहे.

चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांनी या प्रसंगी चित्रपटाच्या सर्व कलाकारांना, तंत्रज्ञासह पूर्ण टीमला पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. नंतर चित्रपटाचा ट्रेलरचे लाॅन्चिग करण्यात आले. ज्याला सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर चित्रपटाचे गाणी प्रदर्शित करण्यात आले.

निर्माता नरेंद्र जिचकारने म्हणाले की “कौमार्य” ही २०१६ मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेतून प्रेरित चित्रपट आहे. समाजासाठी हा विषय महत्त्वाचं आहे आणि ही  कथा सांगणे आवश्यक होती.

निर्माता चारुदत्त जिचकारने सांगितलं की लेखक निर्देशक सलीम शेखने यांनी खूप संवेदनशील विषय या चित्रपटाद्वारे मांडला आहे. आज आम्ही स्त्रिसशक्तीकरणाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे  स्त्रियांवर पूरूषी मानसिकतेतून कौमार्य परिक्षा घेऊन त्यांच्यावर अविश्वास दाखवतो. या चित्रपटातून अशा  मानसिकतेला बदलण्याचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे .”

हॉलिवुडच्या चित्रपटात कार्य केलेले आणि अनेक प्रकारच्या भूमिका केलेले जेष्ठ अभिनेते नागेश भोसले यांनी “कौमार्य” चित्रपटात एक महत्वाची भूमिका केली आहे. ते म्हणाले की या चित्रपटात काम करण्यासाठी मी तयार होतो कारण हे कथा खूप वेगळी आणि उत्तम आहे, यातील माझी भुमिका ही वेगळी आणि कसदार किरदार  आहे.   चित्रपटाच्या निर्मातांनी मला कौमार्यात एक सशक्त भूमिका करण्याची संधी दिली आहे. मला खात्री आहे की लोकांना  हा चित्रपट खूप आवडेल. मला चित्रपटाच्या निर्मातांच्याचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी मला इतक्या चांगल्या चित्रपटात एक छान भूमिका करण्याची संधी दिली.चित्रपटाचा नायक शादाब म्हणाला,मी या चित्रपटात  सूरज ही भुमिका करतोय. जो श्रद्धा कपूरचा मोठा फॅन आहे.नायिकेचे नाव श्रध्दा आहे म्हणून पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम करतो. नंतर त्याच्या जीवनात काय घडतं, समाजाच्या प्रथा आणि मानसिकता कशी आहे, यावर हा चित्रपट भाष्य करतो.या चित्रपटाची कथा खूप वेगळी आहे.

चित्रपटातील अभिनेत्री पूजा शाहू म्हणाली कि “कौमार्य” चित्रपटाचा सबजेक्ट खूप संवेदनशील आहे. स्त्रीच्या कौमार्य तपासणी करण्याची कुप्रथेवर आधारित हा चित्रपट आहे. जसे पुरुष लग्नासाठी वर्जिन मुलगी इच्छितात, तसेच मुलींनी  वर्जिन मुलाशीच लग्न करण्याची मागणी केली तर काय होईल?

अभिनेत्री पूजा शाहू कौमार्य तून पदापॅण करीत आहे.पुजा म्हणाली,कौमार्य” तील श्रध्दा या भुमिकेसाठी अभ्यास करून हे पात्र जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.आम्ही सर्वांनी या चित्रपटासाठी  खूप मेहनत केली आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन कौमार्य बघावा.

या चित्रपटाचे निर्माते नरेंद्र जिचकार, चारुदत्त जिचकार, कथा पटकथा, संवाद लेखन आणि दिग्दर्शन सलीम शेख यांचे आहे. चित्रपटाचे संगीतकार विरेंद्र लाटणकर आणि पुष्कर देशमुख, गीतकार संजय बंसल, डॉ. विनोद राऊत, डॉ. विनोद देवरकर, स्वर श्रुति चौधरी, कैवल्य केजकर, गौरव चाटी, मनीष मोहरिल, छायाचित्रकार हर्षद जाधव यांचं आहे.

चित्रपटात  नागेश भोसले, मिलिंद शिंदे, शादाब, पूजा शाहू, देवेंद्र दोडके, देवेंद्र लुटे, राजेश चिटनिस, सचिन गिरी, आदित्य देशमुख, नीरज जामगड़े, मंजूश्री डोंगरे, आयशा आणि इतरांची भूमिका आहे. चित्रपटाची वितरणाची आणि मार्केटिंगची जबाबदारी ऑडिओ लॅबचे सतीश पुजारी यांनी घेतली आहे.

 

कौमार्य परिक्षेवर आधारित निर्माता नरेंद्र जिचकार आणि चारुदत्त जिचकार यांच्या मराठी चित्रपट “कौमार्य”चे ट्रेलर लॉन्च, २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये जारी होईल

admin